ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी सहा फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था तयार झाली असून त्यात विसर्जनाची व्यवस्था असलेला ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे.
त्या ट्रकवरील टाकीत गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे.
त्यात, 09 विसर्जन घाट, 15 कृत्रिम तलाव, 10 मूर्ती स्वीकृती केंद्र आणि 49 ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे.